अपठीत पद्य
मराठी भाषा विषय ज्यांचा आहे त्यांच्यासाठी अपठीत पद्य
साभार - सोशल मेडिया
कविता लक्ष देवून वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
फक्त एक छान मैत्रीण हवी
देवाला मी आज निवांत पाहीलं आणि लगेच एक फूल वाहिलं
देवाने हसून म्हटलं "मागा, काय जे मनात साठलं."
"देवा मला नको काही, कोऱ्या कागदावर सही घे "
"एक मिनिट, एक मिनिट ... विचारलेच आहेस म्हणून मागतेय.
एक छानशी मैत्रीण दे. हवे तर अजुन एखादे फुल घे.
दिसायला छान नसली तरी चालेल.
पण बोलायला छान असायला हवी.
डोळे सुंदर नसले तरी चालेल,
पण नजरेतून बोलणारी हवी,
केस लांब नसले तरी चालेल,
पण सोबत लांब चालणारी हवी
माझ्या प्रत्येक दुःखात रडली नाही तरी चालेल,
फक्त माझ्या सुखात थोडे हसणारी हवी.
यातलेही काही कमी असेल तरी चालेल,
फक्त एक छान मैत्रीण हवी.
खालील प्रश्नांची योग्य उत्तरे द्या.
प्रश्न १) कवयत्रीने देवाची पूजा कशी केली?
उत्तर _________________________
प्रश्न २) देव प्रसन्न झाल्यावर कवयत्रीने काय माघितले ?
उत्तर _________________________
प्रश्न ३) कवयत्रीस आपल्या मैत्रीणीमध्ये कुठले गुण हवे आहेत?
उत्तर _________________________
प्रश्न ४) तुमच्या चांगल्या मित्र किंवा मैत्रिणीचे सद्गुण सांगा ?
उत्तर _____________________________
नोट: या प्रश्नाचं उत्तर हि पोस्ट शेयर करून कॅप्शन मध्ये लिहा आणि तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीस tag करा.
प्रश्न ५) छान मित्र किंवा मैत्रीण याची तुमची कल्पना कशी आहे?
उत्तर ________________________
नोट: या प्रश्नाच उत्तर comment करा.
नोट: हि कविता मित्र किंवा मैत्रिणीशी संबंधित निबंधात तुम्ही लिहू शकता.
इथपर्यंत वाचल्या बद्दल धन्यवाद!
=============================
Please
check these links:
My Blogs:
Facebook
Page:
रोहिणी ब्लॉग्स और वीडियो कलेक्शन
YouTube
Channels:
2) One Liners
Telegram
channel
Blogs and Videos by Rinki_Rohini
======================
No comments:
Post a Comment