मराठी भाषा विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपठीत गद्य या शीर्षकाखाली वरील कविता दिली आहे. हि कविता मला सोशल मिडिया वर सापडली आहे. कवी कवियत्री कोण आहे माहित नाही . कृपया माहित असल्यास त्यांचे नाव comment करा.
खर तर कविता गुरु समर्पणाची आहे पण युवा पिढी ने अश्या कविता लक्षपूर्वक वाचायलाच हव्यात या साठी खालील प्रश्न उत्तरे या कविते सोबत दिलेली आहेत.
रोज नामस्मरण
केल्यावाचून राहू नकोस
गुरु पाहताहेत तुला
नामस्मरण मात्र विसरु नकोस...
तुझ्या वाटेत आडवे खूप येतील...
पायात पाय घालून पाडतील....
त्यांना घाबरून तुझं
उभं राहणं सोडू नकोस..
गुरु पाहताहेत तुला,
नामस्मरण मात्र विसरु नकोस....
तुझं कौतुक प्रत्येकाला इथं
रुचेलच असं नाही....
कौतुकासाठी तुझं नांव
सूचेलच असं नाही....
तू मात्र इतरांचं कौतुक
करण्यास कचरु नकोस..
गुरु पाहताहेत तुला,
नामस्मरण मात्र विसरु नकोस....
तुलासुद्धा मन आहे
हे माहीत आहे मला.....
पण परमेश्वर हृदयात असताना काय रे कमी तुला....
इतरांना भरभरून देणं मात्र
कधी सोडू नकोस ...
गुरु पाहताहेत तुला,
नामस्मरण मात्र विसरु नकोस....
रडावंसं वाटतं तेव्हां
रडून तू मोकळा हो...
कार्यासाठी लढावंसं वाटतं तेव्हां,
लढून तू मोकळा हो....
रडण्यामध्ये मात्र तुझे
कार्य विसरू नकोस
गुरु पाहताहेत तुला,
नामस्मरण मात्र विसरु नकोस....
तुझ्या कार्याचे कोणाला
पुरावे द्यायची गरज नाही...
कुणासाठी तुला कार्य
सोडायची गरज नाही...
गुरु संकल्पासाठी पुढे
चालणं तू सोडू नकोस.......
गुरु पाहताहेत तुला,
नामस्मरण मात्र विसरु नकोस...
श्री स्वामी समर्थ
==================
अपठीत गद्य
वरील कविता लक्ष पूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
प्रश्न १) नामस्मरण का करायला
हवे?
उत्तर:
_________________________
प्रश्न २) जीवनात
कुठल्या अडचणी येतात? कवितेतून वाचून विस्तार पूर्वक लिहा.
उत्तर:
___________________
प्रश्न ३) या कवितेत
गुरूचा प्रत्येक अडचणीमध्ये काय उपदेश आहे?
उत्त्तर:
____________________
प्रश्न ४) परमेश्वर
ज्याच्या हृदयी असतो त्यांचे जीवन कशे असते?
उत्तर:
____________________
प्रश्न ५) रडावस वाटलं
तर काय करायला हव?
उत्तर:
______________________
प्रश्न ६) या कवितेनुसार
मनुष्याने काय-काय करायच नाही आहे?
उत्तर: _____________________
प्रश्न ७) या
कवितेनुसार मनुष्याने आपल्या जीवनात काय काय करायला हव?
उत्तर:
_________________________
प्रश्न ८) कवी या कवितेत म्हणतात "गुरु तुला पाहत आहे" याचा अर्थ काय?
उत्तर: _________________________
इथपर्यंत वाचलं त्यासाठी धन्यवाद. हा ब्लोग युवा पिढीसोबत शेयर करा.
=============================
Please
check these links:
My Blogs:
Facebook
Page:
रोहिणी ब्लॉग्स और वीडियो कलेक्शन
YouTube
Channels:
2) One Liners
Telegram
channel
Blogs and Videos by Rinki_Rohini
======================
No comments:
Post a Comment