अपठीत गद्य
मराठी भाषा विषय असणाऱ्या सर्व विद्यार्थांसाठी हा ब्लोग आहे.
हा लेख मला सोशल मेडिया वर सापडला. मला अस वाटत कि हा लेख नवयुवकांनी आवर्जून
वाचायलाच हवा. हा लेख लिहिणाऱ्या लेखकाचे मी आभार मानते कि त्यांनी असा उत्तम लेख
लिहिला. (जर कुणास मुल लेखक माहित असेल तर कृपया नाव comment करा)
सर्वांनी हा लेख लक्षपूर्वक वाचवा या साठीच अपठीत गद्य स्वरुपात हा लेख इथे
परत लिहिण्यात आला आहे तरीही वाचकांना विनंती आहे कि त्यांनी हा लेख वाचून खालील प्रश्नांची
उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा. खास करून विध्यार्थीवृंद!
लेख
सुधाकरराव म्हणाले, "भारतात आम्ही दोघेच आहोत. वय झालं आहे. तीच सततचं दु:खणं असतं. दवाखान्यात न्यायला कुणी सोबत नाही. साधी दूधाची पिशवी कुणी आणायची हा प्रश्न आहे.
तो शेजारचा आसाराम माझ्या पेक्षा कैक पटीने सुखी आहे. चारपाच मुलं, दोन-तीन मुली, आठ दहा नातवंडं! नुसता गोंधळ असतो. त्याचे कुणी पाय चोपत असतं, तर डोकं चोपत असतं, तर कुणी डोक्याला तेल लावतं असतं.
साधा खोकला आला तर चार चार जण आसारामला उचलतात, दवाखान्यात नेतात, सलाईन लावतात. पलंगावर दोघं जण उषा पायथ्याला बसतात. दवाखान्याबाहेर आठ-दहाजण बसून असतात. कुणी शिरा आणतं, कुणी सफरचंद आणतं, कुणी बिस्किटं आणतयं. आसारामच्या दिमतीला पंधरा माणसं*.
आमचा मोठा बंगला, लाखभर पेन्शन, अलिशान गाडी, पण साधं गेट उघडायला कुणी नाही.
गाडी चालवायला कुणी नाही. त्या आसारामच्या दारांत मोडक्या तुडक्या का असेना चारपाच बाईक उभ्या असतात. कुणी भाजी आणतयं, कुणी पिण्याचं जार आणतंय, कुणी दळण आणतंय, कुणी भेटायला आलेल्या पाहुण्याला सोडायला जातय, कुणी स्टॅन्डवरच्या पाहुण्याला आणायला जात असतय.
म्हतारी दोनचार नातवाला घेवून किराणा दुकानांवर दिवसभर चकरा मारत असते.
रात्री बारा वाजे पर्यंत यांचा आरडा ओरडा, गप्पा, हास्य कल्लोळ चालुच असतो. दहा बारा पत्र्यांचं घर आणि अंगण कस गजबजलेलं असतं.
माझ्या कॅनडाच्या मुलाला ३० लाखांच पॅकेज, ऑस्ट्रेलिया वाल्याला ३५ चं पॅकेज आणि आम्हांला लाख भर पेन्शन.
त्या आसारामचा सारा खेळ रोजचा हजार दोन हजाराचाच. पण काय थाट. साधा पाण्याचा मातीचाच माठ पण थंडगार पाणी, जीवन सोन्यावाणी. माझ्यांकडे कुत्रं नाही. आसारामकडे माणसंच माणसे. आता बोला आम्ही वांझ नाही तर काय आहोत.
परवा मोठ्यां मुलांला हि बोलली एकदा ये महिनाभरासाठी तर तो म्हणाला, "महिनाभरासाठी? मला एक तासाचा वेळ नाही."
चीडून हि म्हणाली, "मेल्यावर तरी येणार कां नाही?"
तेव्हा तो काहीच बोलला नाही. फोन खाली ठेवला.
सांगा शंकरराव *आम्ही वांझोटे नाही तर काय आहोत.
मला माझं काही वाटत नाही. मी गेल्यांवर शेवंतीच कसं होईल हीच चिंता आहे. नापास मुलंच आई बापांचा खरा आधार आहेत. आसारामचं एक पोरगं मॅट्रीक पास नाही, पण त्याच्या इतका सुखी कुणी नाही.
परवा आसारामच्या मुलांनं हिला दवाखान्यात नेलं आणलं. आसारामच्या सुनाने स्वयंपांक करुन दिला. काय मिळवलं मी कुणांसाठी?
मुलं म्हणतात आम्हांला तुमचं घर नको शेती नको ! आणि आणि तुम्हीही नकोत."
सुधाकररावांचे डोळे भरून आले.
सुधाकरराव एकदम कठोर झाले. म्हणाले, "मी वांझोटा नाही राहणार. मी माझं सारं सारं आसारामच्या मुलांना दान करणार. बदल्यांत फक्त प्रेमळ चटणी भाकरीचाच सहवास मागणार. बाकी काही नको."
जीवन केवळ धन नाही तर सुखी मन खरं धन आहे.
मुलं आय आय टी झाली आणि आय माय टि ला म्हणजे चहा ला महाग झाली.
मुलं असावीत पण कामाची असावीत. नुसती पाटी लावायला कशाला हवीत.
सहकुंटुंब सहपरिवार तेथे
आनंदाला नाही पारावर.
वरील बोधप्रद पण सत्य वस्तुस्थिती आहे.
आजच्या तरुण पालकांनी विचार करायला हवा कि त्यांना काय हवं आहे
मोठे घर पोकळ वासा, हवा की घर गोकुळासारखे भरलेले पाहीजे.
पैसा हवा की, समाधान शांती.
प्रेम हवयं की, दुरावा.
एकलकोंडे रहायचं की, आनंदी परीवारात.
माणुसकी हवी की, फक्त पैसा.
आणि त्यानुसारच आपल्या मुला-मुलींना संस्कार द्यावेत. भौतिक सुखाची अवास्तव अपेक्षा करु नका. हे क्षणिक सुख आहे.
इतरांच्या घरी माणिक मोती पैसा कणसं
माझ्या घरी लाख मोलाची जीवाभावाची माणसं
खालील प्रश्नाची उत्तरे द्या? (ज्या प्रश्नांची उत्तरे comment करण्यास
सांगितली आहेती ती नक्की comment करावीत)
प्रश्न १) वृद्ध माता आणि पिता ज्यांची मुले त्यांच्यापासून दूर राहतात त्यांना
काय काय समस्यांचा सामना करावा लागतो?
उत्तर: _________________________
प्रश्न २) आसाराम का सुखी आहे?
उत्तर: ____________________________
प्रश्न ३) सुधाकाररावाना असे का वाटते कि ते वांझ आहेत?
उत्तर: ____________________________
प्रश्न ४) शाळेत नापास मुलं आई वडिलांचा आधार का होतात? लेख वाचून योग्य उत्तर
द्यावे?
उत्तर: _____________________________
प्रश्न ५) तरुण पालक ज्यांना आता लहान मुल-बाळ आहे त्यांनी आपल्या मुला-बाळास
कुठल्या गोष्टींचा विचार करून संस्कार द्यावेत?
उत्तर: ____________________________
प्रश्न ६) सुधाकारारावांच्या मदतीला जसे आसाराम चे सुना-मुलं आली तशी तुमच्या
आई-वडिलांची मदत करण्यासाठी कोण आहे?
उत्तर: _______________________________ (comment करून सांगा.)
लेख इथपर्यंत वाचला त्यासाठी धन्यवाद! हा ब्लोग खर तर पालकत्व कसं करावं यासाठी आहे. हा ब्लोग सर्व सुजाण मित्र मंडळींसोबत शेयर करा आणि comment करा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे.वंदे मातरम!
No comments:
Post a Comment